स्मार्ट बुलढाणा

भीषण अपघात: शाळकरी मुलांच्या “इको” आणि बुलेटमध्ये धडक

अपघातात एकाचा मृत्यू, ४ विद्यार्थी गंभीर जखमी; बुलढाणा-देऊळघाट मार्गावरील घटना 

बुलढाणा,(प्रतिनिधी) : शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या इको सीटर कार व बुलेटमध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एका ३८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले. आज सायंकाळी बुलढाणा-देऊळघाट मार्गावर ही घटना घडली.

देऊळघाट येथील विद्यार्थी बुलढाणा येथील शाळेत शिक्षण घेतात. आज सायंकाळी एक इको सीटर वाहन ७ ते ८ विद्यार्थ्यांना घेऊन बुलढाणा येथील शाळेतून देऊळघाटच्या दिशेने निघाले. सायंकाळी ६.३० च्या सुमारास हे वाहन निवांत हॉटेलजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या बुलेटची आणि या वाहनाची धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की, इको वाहनाने रस्त्यावर दोनदा पलटी खाल्ली. या अपघातात बुलेटस्वार रियाज बेग जफर बेग जखमी झाले, मात्र त्यांच्या मागे बसलेले मोहम्मद तौसिफ मोहम्मद युसुफ (वय ३८ वय) रा. शेंदुर्णी, जि. जळगाव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तौसिफ हे देऊळघाट येथे आपल्या मामाकडे आले होते. तसेच या अपघातात इकोमधील महेश गणेश कानडे, रुद्र गजानन कटक, राजश्री शिवा माळोदे आणि शेजल शंकर कटक ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!