स्मार्ट बुलढाणा

भीषण अपघात: भरधाव बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

दाताळा नजीक वृद्धाश्रमाजवळील घटना

अजय टप

मलकापुर,(प्रतिनिधी) : बुलढाणा रोडवर असलेल्या दाताळा नजीकच्या वृद्धाश्रमाजवळ भरधाव बोलेरो गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजे दरम्यान घडली. जखमीवर मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शेलापूर येथील सुरेश भोपळे (वय ४५ वर्षे) हे मलकापूरवरून बजाज डिस्कवर मोटरसायकल क्रमांक एमएच-२८-डब्ल्यू-३४६१ ने शेलापुर येथे आपल्या घराकडे जात होते. तर एमएच-२८-एच-९०७६ क्रमांकाची बोलेरो गाडी दाताळाकडून मलकापूरकडे येत होती. त्यावेळी बोलेरो चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दाताळा येथील हरी चैतन्य महाराज वृद्धाश्रमा जवळ दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी स्वार सुरेश भोपळे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला असून त्यांना प्राथमिक उपचारार्थ दाताळा येथील पत्रकार विलास खर्चे, सुहास नारखेडे, राहुल पाटील, सोहम पाटील सह आदींनी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळता बरोबर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, ॲड. हरीश रावळ यांनी रुग्णालयात धाव घेत जखमीची विचारपूस केली. सुरेश भोपळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!