क्राईम जगत

सावधान! जिममध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

१७ महिन्यांच्या चिमुरडीसह आईही झाली गायब

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि त्यातच महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. अवघ्या २४ तासांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून पुन्हा महिला आणि मुली बेपत्ता झाल्या. विशेष म्हणजे, एका घटनेत चक्क आईसोबत तिची १७ महिन्यांची चिमुरडीही गायब झाली. तर दुसऱ्या घटनेत जिममध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

माहेरी गेली अन् मुलीसह बेपत्ता झाली

जानेफळ: जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या टाकरखेड हेलगा येथील सागर भगवान दांडगे ह.मु. देऊळगाव साकर्शा हे आपली पत्नी वैष्णवी सागर दांडगे (वय २३ वर्षे ) आणि १७ महिन्यांची मुलगी नायरा हिच्यासह विटभट्टीवर मजुरीचे काम करतात. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास, मी आपल्या माहेरी नायगाव दत्तापूर येथे पालकांना भेटायला जात आहे, असे पतीला सांगून वैष्णवी घरातून बाहेर पडली. मात्र, सायंकाळी जेव्हा पतीने सासरवाडीला फोन केला, तेव्हा वैष्णवी तिथे पोहोचलीच नसल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितले. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु माय-लेकींचा कोठेही पत्ता लागला नाही. वैष्णवीचा रंग सावळा, उंची ५ फूट, बांधा सडपातळ असून तिने अंगात शेंद्री रंगाची साडी, लालसर ब्लाउज आणि काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे. या प्रकरणी जाणेफळ पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार अतुल पवार हे करीत आहेत.

जिममधून अल्पवयीता गायब

बुलढाणा: बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुना गाव परिसरात राहणारी एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सध्या इयत्ता १२ मध्ये शिक्षण घेत आहे. आज १९ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास ती शहरातील धर्मवीर आखाडामध्ये जिमसाठी गेली होती. सोबत असलेल्या मैत्रिणीला “मी पाच मिनिटात परत येते”, असे सांगितले आणि ती तिथून निघून गेली, ती परतलीच नाही.

दरम्यान, शहरातील आंबेडकर नगर परिसरात राहणारा विशाल पडोळकर हा तरुण बेपत्ता मुलीच्या सतत संपर्कात होता आणि तिच्यासोबत फोनवर बोलत होता.विशालनेच आपल्या मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला असून याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चापाइतकर हे करीत आहेत. या दोन्ही बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!