क्राईम जगत

मलकापुर: घरगुती वादातून विवाहितेस बेदम मारहाण

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): कौटुंबिक वादातून एका २८ वर्षीय विवाहितेस लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना मलकापूर शहरातील हनुमाननगर भागात नुकतीच समोर आली. या घटनेप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूर शहरातील हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या शुभांगी विनोद मोरे (वय २८ वर्षे) या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात घरातील किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी संगनमत करून शुभांगी यांना “तू घरातून निघून जा”, असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि आरोपी विनोद रमेश मोरे याने शुभांगी यांना चापटबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, आरोपी दिपक रमेश मोरे याने लाकडी काठीने शुभांगीच्या हातावर व पायावर जोरदार वार केल्याने त्या जखमी झाल्या. तसेच घरातील इतर महिला आरोपी रूपाली योगेश मोरे आणि स्वाती दिपक मोरे यांनी तिला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी शुभांगी मोरे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुनिल राउत हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!