क्राईम जगत

शिवण क्लासला गेलेली विवाहिता बेपत्ता

खामगाव शहर पोलिसांत हरवल्याची नोंद

अजय टप 
मलकापूर, (प्रतिनिधी): शिवण क्लासला गेलेली एक २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंगची दाखल केली असून विवाहितेचा शोध सुरू आहे.
खामगाव तालुक्यातील वाडी येथील रहिवासी असलेले विनोद महादेव इंगळे (वय ३२ वर्षे) हे मजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी प्रियंका विनोद इंगळे (वय २५ वर्षे) ही २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शिवण क्लासला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, क्लासची वेळ संपून बराच वेळ उलटल्यानंतरही प्रियंका घरी परतली नाही. पतीने सुरुवातीला प्रियंका आपल्या मैत्रिणींकडे किंवा नातेवाईकांकडे गेली असावी, या आशेने सर्वत्र शोध घेतला. खामगाव शहरातील प्रमुख ठिकाणे, बस स्थानक आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र, तिचा कोठेही पत्ता लागला नाही. प्रियांकाचा रंग सावळा, उंची: ५ फूट, सडपातळ बांधा असून तिने उजव्या विनोद नाव गोंदलेले आहे.
याप्रकरणी विनोद इंगळे यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी खामगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष गायकवाड हे करीत आहेत. उपरोक्त महिलेबाबत माहिती मिळाल्यास खामगाव शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!