क्राईम जगत

अवघ्या काही दिवसांत मोटारसायकल चोर जेरबंद

चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई

चिखली,(प्रतिनिधी): चिखली पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात तपास चक्र फिरवत एका मोटारसायकल चोराला अटक केली. नव्हेतर त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळवत २७ जानेवारी रोजी चिखली पोलिसांच्या अभिलेखावात दाखल झालेल्या तक्रारीचा लावला.
चिखली येथील विश्रामगृह परिसरात पार्क केलेली हिरो एचएफ डीलक्स क्रमांक एमएच-२८-एडब्ल्यू-२६२१ ही मोटारसायकल २० जानेवारी २०२६ रोजी अज्ञात चोरट्याने चोरून होती. याप्रकरणी चिखली पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीचा आरोपी जाफ्राबाद तालुक्यातील भारज बुद्रुक येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तात्काळ भारज येथे सापळा रचला. संत सावता माळी भवनाजवळ संशयित आरोपी कृष्णा आत्माराम पवार (वय २४ वर्षे) रा. उमरखेडा (ता.भोकरदन) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या गाडीच्या इंजिन आणि चेसिस नंबरची पडताळणी केली असता, ती गाडी चिखली येथून चोरी झालेलीच असल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कृष्णा पवार याने नंतर चोरीची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि भूषण गावंडे, पीएसआय शरद भागवतकर, राजेंद्र काळे, अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, निलेश सावळे, विशाल वायाळ, रूपाली उगले, कैलास चतरकर आणि ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!