स्मार्ट बुलढाणा

सावरगाव नेहू येथील महिलेने संपवली जीवनयात्रा

विषप्राशन करून आत्महत्या;नांदुरा तालुक्यातील घटना 

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): तालुक्यातील सावरगाव नेहू येथील एका ३९ वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीस उघडकीस आली. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सावरगाव नेहू येथील रहिवासी असलेल्या कल्पना गणेश माने (वय ३९ वर्षे) यांनी आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच पती गणेश रामेश्वर माने यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. डॉ. वानखेडे यांच्या सहीने कक्षसेविका अलका काळे यांनी पोलीस स्टेशनला पाठवलेल्या मेमोवरुण मलकापूर शहर पोलिसांनी झिरो प्रमाणे मर्ग दाखल प्रकरण नांदुरा पोलिसांकडे वर्ग केले आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल खोंदील हे करत आहेत. या घटनेमुळे सावरगाव नेहू परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!