क्राईम जगत

धक्कादायक! मलकापुरात भररस्त्यात महिलेची सोनसाखळी खेचली

दुचाकीस्वार चोरट्यांचा सिनेस्टाईल थरार!

अजय टप

मलकापूर,)प्रतिनिधी) : मलकापूर शहरातील चाळीसबिघा परिसरातील देशमुख हॉस्पिटलसमोर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी एका ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शहरात गुन्हेगारांचे धाडस वाढल्याने आता महिलांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.

शहरातील गोपाल कृष्णनगरमध्ये राहणाऱ्या शोभा राजेंद्र यादगीरे (वय ६५ वर्षे) या आपली ड्युटी संपवून घरी जात होत्या. त्या देशमुख हॉस्पिटलसमोरील चाळीसबिघा परिसरात पोहोचल्या असता, समोरून अचानक एक मोटारसायकल येऊन त्यांच्या जवळ थांबली. सदर गाडीवर बसलेल्या दोन अज्ञात इसमांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (किंमत अंदाजे ४५ हजर रुपये) हिसकावून घेतली. तसेच महिलेला धक्का देत चोरटे दुचाकीवरून सुसाट वेगाने पसार झाले. गजबजलेल्या भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ‘चाळीसबिघा’ सारख्या परिसरात जर महिला सुरक्षित नसतील, तर सुरक्षित कुठे?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी शोभा यादगीरे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वारे हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!