स्मार्ट बुलढाणा

दिनविशेष:आजच्याच दिवशी का अंमलात आणले “भारतीय संविधान” !

काय आहे २६ जानेवारी या तारखेत खास?

बुलढाणा:२६ जानेवारी १९२९ रोजी लाहोरजवळ असलेल्या रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केल्या गेली. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.

“भारतीय संविधान” २६ जानेवारी १९५० रोजी देशभरात पूर्णपणे अंमलात आले. या दिवसापासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले. प्रजेची सत्ता सुरू झाली. त्यामुळे दरवर्षी देशभरात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीमधील कर्तव्य पथावर होणारं लष्कराचं संचलन, शस्त्रास्त्रांचं  प्रदर्शन, थरारक कवायती आणि देशाभरातील विविध राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ हे तर खास आकर्षण असतं. दरम्यान, यावेळच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनामध्ये दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचाही चित्ररथ दिसणार असून, या चित्ररथामधून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा देखावा पाहता येणार आहे.

प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताकदिन म्हणून साजरा केला जातो. आपला भारत राष्ट्रध्वज वापरून दोन प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करतो. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान औपनिवेशिक राजवटीपासून स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला ध्वज फडकावतात. २६ जानेवारी रोजी, राष्ट्रपती राज्यघटनेच्या दत्तकतेचे प्रतिनिधित्व करणारा ध्वज फडकवतात.

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!