https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

राजूरा शिवारात नरसंहार: धडावेगळे मुंडके अन् रक्ताळलेले रान; जळगाव जामोद हादरले!

अजय टप

जळगाव जामोद (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्याच्या शांततेला सुरुंग लावणारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारात उघडकीस आली आहे. मानवी क्रूरतेचा कळस गाठत एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके धडापासून वेगळे करून फेकून दिल्याचे रविवारी सकाळी समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात दहशतीचे सावट पसरले असून, गुन्हेगारांनी पोलिसांना दिलेल्या या खुल्या आव्हानाने खळबळ उडाली आहे.

नेहमीप्रमाणे राजूरा शिवारातील शेतकरी आपल्या कामासाठी शेतात जात असताना, सकाळी साधारण ८ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याची नजर झुडपांजवळ पडलेल्या एका वस्तूवर पडली. जवळ जाऊन पाहताच त्या शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर एक मानवी मुंडके पडलेले होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्या मुंडक्यावरील मांस आणि केस मोठ्या प्रमाणात गळालेले होते, ज्यामुळे हे दृश्य इतके भीषण होते की पाहणाऱ्याचा थरकाप उडत होता. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच गावकरी घटनास्थळी जमा झाले. जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सुरुवातील पोलिसांना केवळ मुंडके सापडले होते, त्यामुळे धड कुठे? हा मोठा प्रश्न होता. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली आणि लगतच्या घनदाट जंगल भागात शोधमोहीम हाती घेतली. काही तासांच्या थरारक शोधनतंर, मुंडक्यापासून काही अंतरावरच एका झुडपात छिन्नविछिन्न अवस्थेत धड मिळून आले. मृतदेहाची अवस्था पाहून हा प्रकार अत्यंत थंड डोक्याने केलेला खून असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

चक्राव्यूह पोलिसांपुढील मोठी आव्हाने

या घटनेने पोलीस प्रशासनासमोर प्रश्नांचा डोंगर उभा केला आहे. तपासाच्या सुरुवातीलाच पोलिसांना खालील कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मृतदेहाचे मांस आणि चेहरा छिन्नविछिन्न झाल्यामुळे मृत व्यक्ती नक्की कोण आहे, हे ओळखणे कठीण झाले आहे. आरोपीने अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात फेकला आहे. पाऊस किंवा वन्य प्राण्यांमुळे घटनास्थळावरील महत्त्वाचे ठसे किंवा पुरावे मिळवण्यात अडथळे येत आहेत. हा केवळ खून आहे की यामागे काही अघोरी प्रथा, जादूटोणा किंवा मानवी बळीचा प्रकार आहे? हा संभ्रम पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहे. ग्रामीण आणि जंगल परिसर असल्याने तांत्रिक पुराव्यांची कमतरता आहे, त्यामुळे पोलिसांना केवळ खबऱ्यांच्या माहितीवर अवलंबून राहावे लागत आहे. पोलीस हे आव्हान पेलणार का?, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गुन्हेगारांनी अत्यंत निर्ढावलेल्या मानसिकतेतून हे कृत्य केले असल्याने, त्यांना शोधून काढणे ही पोलिसांसाठी एक ‘लिटमस टेस्ट’ ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!