मालगाडीला धडकून अनोळखी इसमाचा मृत्यू

शेगाव,(प्रतिनिधी):
रेल्वे मालगाडीला धडकून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २६ नोव्हेंबरच्या सकाळी ८.१५ वाजता शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खांब नंबर ५८४/८ जवळ घडली.
गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.१४ वाजता एक अनोळखी इसम खांबा नंबर ५८४/८ जवळ एका माल गाडीला धडकला. त्यामुळे त्याच्या डाव्या बाजूच्या कानावरील कवटी फुटून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शेगाव रेल्वे स्थानक प्रबंधक यांच्या मेमोवरून रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृतकाचे उंची ५ फुट ५ इंच, रंग गोरा, बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे पांढरे, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे बारीक, दात पूर्ण, मिशी बारीक, उजव्या दंडावर ओम गोंदलेले आहे. उपरोक्त वर्णनाच्या इसामाबद्दल काही माहिती मिळाल्यास शेगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन रेल्वे पोलीस पांडुरंग वसु यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!