क्राईम जगत
लिंगपिसाटाचे अनैसर्गिक कृत्य! बारा वर्षाच्या चिमुकल्यास केले भक्ष?
मलकापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : समाजात कोणताही गाजावाजा न करता भगवंताचे नामस्मरण करणारे अनेकजण आहेत. तर वरकरणी धार्मिकतेचा आव आणणारे, तर काही सोशल मीडियावर फार मोठे देवभक्त असल्याचे स्टेट्स लावुन मिरवणारे मुखवटाधारीही दिसतात. असाच चारित्र्याचा मुखवटा घालून मिरवणाऱ्या एका महाभागाने विकृत चाळे करून एका बारा वर्षाच्या निरागस मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची जोरदार चर्चा गेल्या तीन दिवसांपासून मलकापूर तालुक्यात रंगली आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
सर्वत्र हिरवाईने नटलेले, निसर्गरम्य वातावरण, शांतता आणि साधेपणा येथील नागरिकांची ओळख असलेले व मलकापूर तालुक्यात येणारे हे गाव गेल्या तीन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. एका २०-२५ वर्षाच्या टोंग्याने आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी चक्क बारा वर्षाच्या मुलाला शिकार बनवल्याची जोरदार चर्चा चौका-चौकात रंगल्या आहेत. नव्हेतर या घाणेरड्या कृत्यामुळे मुलाला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याच्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार करून घेत सदर प्रकरण रफादफा केल्याचेही चर्चिल्या जात आहे. मात्र, घटनेचे स्वरूप अत्यंत संवेदनशील असल्याने लोकं उघडपणे बोलण्यास स्पष्ट नकार देत आहेत.
तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात घडलेल्या या अनैसर्गिक प्रकाराबाबत सगळं माहिती असल्याचा दावा काहींनी केला असला तरी, आम्हाला गप्प बसण्याची सक्ती आहे, याशिवाय दुसरा पर्याय देखील उपलब्ध नसल्याचे भययुक्त शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडत आहेत. त्यामुळे खरच अशी काही घटना घडली का? घडली असेल तर “तो” नराधम कोण आहे?, असे अनेक प्रश्न आता अधिकच गंभीर बनत चालले आहे.
पोलिसांचा अभिलेख निरंक
चर्चिल्या जात असलेल्या प्रकाराबाबत मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, किंवा आमच्यापर्यंत अशी काही तक्रार आलेली नाही, तसेच कोणताच गुन्हा देखील नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चर्चेतील सत्य शोधण्याची गरज
दबक्या आवाजात सुरू असलेल्या या चर्चेत काही तथ्य आहे का? आरोपीची भीती, सामाजिक दबाव, प्रतिष्ठेचा आडोसा, की एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा सहभागामुळे तर नागरिकांनी चुप्पी साधली नाही ना? घडलेला प्रकार वैयक्तिक विकृती आहे, की संघटित टोळीचे काम?, या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासह रंगलेल्या चर्चांना “विराम” लागणे अत्यावश्यक आहे. यासाठी पोलिसांनी आपल्या गुप्त खबऱ्याकडून माहीत काढून, बारकाईने चौकशी करणे गरजेचे आहे.



