स्मार्ट बुलढाणा

स्वातंत्र्यसैनिक स्मारकालगत मद्याच्या बाटल्या!

हुतात्मा पुंडलिक मराठा सार्वजनिक वाचनालय घाणीच्या विळख्यात 

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : मलकापूर शहरातील नगर परिषद हद्दीत असलेल्या हुतात्मा पुंडलिक मराठा सार्वजनिक वाचनालय तसेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या स्मारकाला सध्या घाणीने विळखा घातला. नव्हेतर नशायुक्त दारूच्या बाटल्यांचा सडा याठिकाणी पडलेला असल्याचे आढळून येत आहे.
देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाचे झालेले हे हाल म्हणजे मलकापूर शहराच्या प्रतिमेला काळिमा फासणारे आहे. या परिसरात नियमित साफसफाई होत नसून दुर्गंधी पसरली असून अस्वच्छता व असामाजिक घटकांचा याठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. येणाऱ्या १७ दिवसानंतर प्रजासत्ताकदिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने संपूर्ण परिसराची साफसफाई करून घाणीची विल्हेवाट लावुन मद्याच्या बाटल्या व कचरा हटवावा, नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून समोर आली आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी द्यावे लक्ष
या गंभीर प्रकरणाकडे नगर परिषद मुख्याधिकारी यांनी तत्काळ लक्ष द्यावे. लक्ष द्यावे आणि प्रजासत्ताक दिनापूर्वी शहराच्या प्रवेशद्वारावरील हा विद्रूप प्रकार दूर करावा, अशी मागणी मलकापूर वासियांकडून होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!