क्राईम जगत

अंढेऱ्यात लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण

चिखली,(प्रतिनिधी) : ओळखीचा फायदा घेत मैत्री केली…मैत्रिचा आधार घेत प्रेमाच्या आनाभाका घेतल्या…लग्नाचे खोठ आश्वासन देऊन पीडितेचा विश्वास संपादन केला. एवढ्यावरच न थांबता पीडितेचे लैगिक शोषण केले. विश्वास आणि पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली. पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी दहिद येथील आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाणा तालुक्यात येणाऱ्या दहिद येथील रहिवासी असलेला आरोपी नितीन शिवाजी बिल्लारी याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. ‘तुझ्याशी लग्न करेनच, असे आश्वासन देऊन आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन केला. याच विश्वासाचा फायदा उचलत गेल्या काही महिन्यांपासून त्याने पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडितेने आरोपीकडे लग्नाची मागणी केला असता, आरोपीने आपला खरा रंग दाखविला. नव्हेतर तु लग्न कधी करणार आहेस, तारीख कधीची ठरवायची, अशी विचारणा करणाऱ्या पीडितेला त्याने लग्न करणार नसल्याचे सांगत सरळ नकार दिला. एवढ्यावरच न थांबता पीडितेसोबत वाद घालुन तीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच शारीरिक मारहाणही केली. प्रेमाच्या नावाने झालेली फसवणूक, असाह्य झालेले शारीरिक अत्याच, यामुळे मानसिकदृष्ट्या हतबल झालेल्य पीडितेने अखेर हिंमत करत अंढेरा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांसमोर आपबिती कथन केल्यानंतर पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६९, ११५ (१), तसेच ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.

गोडगोड बालुन विश्वास संपादन करायचा, त्यानंती लग्नाचे आमिष दाखवायचे आणि लैंगिक शोषण करुन फसवणूक करायची, अशी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब समातील सर्वच घटकांना चिंता व्यक्त करायला लावणारी आहे. खेडेगावात घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!