धाडच्या “जीवनदान महाकुंभा”त १२४ दात्यांचे रक्तदान 

धाड,(प्रतिनिधी) : “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान”, असल्याने एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, या उदात्त हेतूने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदाय संस्थान तर्फे ११ जानेवारी रोजी धाड येथील शासकीय विश्राम भवनात “जीवनदान महाकुंभ” पार पडला. यामध्ये तब्बल १२४ दात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावलं. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला.
“जीवनदान महाकुंभ” या भव्य रक्तदान शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन “व्हॉईस ऑफ मीडिया” पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवशंभू स्मारक समिती, अध्यक्ष वैभवराजे मोहिते, भाजप जिल्हाध्यक्ष देविदास पाटील जाधव, दिगंबर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी रक्ताची गरज आणि रक्तदानाचे महत्त्व आपल्या भाषणातून अधोरेखित केले. आ. श्वेताताई महाले यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक करत आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा केली. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना जीवदान मिळते,” असे मतही व्यक्त केले.
सकाळी १०.३० वाजता सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी ५ वाजता संपले.या दरम्यान तब्बल १२४ दात्यांनी रक्तदान केले. बुलढाणा येथील जीवनधारा ब्लड बँकेच्या चमूने या ठिकाणी रक्तसंकलित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पश्चिम विदर्भ उपपीठ इंजिनिअर प्रमुख दीपक चिंचोले, जिल्हा निरीक्षक लताताई चिंचोले, जिल्हाध्यक्ष गणेश खडोळ, जिल्हा महिला अध्यक्ष आशाताई निंभोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रमेश नामदेव गुजर, जिल्हा कर्नल संजय हराळ, प्रोटोकॉल अधिकारी अनिल जवंजाळ, जिल्हा सचिव प्रवीण कऱ्हाळे, जिल्हा अध्यात्मिक प्रमुख सविताताई वाकोडे यांच्या मार्गदर्शनात युवाध्यक्ष विकास काकडे, सचिव सुनील सिरसाठ, बुलडाणा तालुका महिलाध्यक्ष मालतीताई सुसर, सेवाकेंद्र अध्यक्ष दादाराव पंडित, हनुमंता सनांसे, प्रहार तालुका प्रमुख सुनील वाघ, युवासेना, महिला सेना, गुरुसेवक, संग्राम सैनिक, सेवाकेंद्र समिती आणि आरती समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख गीतांजली सनांसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!