महाराष्ट्र माझा

दिनविशेष:नरवीर तानाजी मालुसरे बलिदानदिन

नरवीर तानाजी मालुसरे (१६२६-१६७०) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र, विश्वासू सुभेदार आणि मराठा साम्राज्याचे शूर सेनापती होते. १६७० मध्ये सिंहगडाच्या (कोंढाणा) लढाईत त्यांनी प्राणांची आहुती देऊन मुघलांकडून गड जिंकला, ज्यावर शिवाजी महाराजांनी “गड आला, पण सिंह गेला” असे उद्गार काढले होते.

तानाजी हे सातारा जिल्ह्यातील गोडवली गावचे सुपुत्र होते. तानाजींचा जन्म सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गोडवली गावात झाला आणि ते महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. ते शिवाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासातील सरदार होते. अफजलखानाची स्वारी, तोरणा किल्ला ताब्यात घेणे आणि इतर अनेक मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी तानाजींची निवड केली. त्यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाही, “आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे” असे म्हणत ते लढाईसाठी गेले. उदयभान राठोड या मुघल किल्लेदाराशी झुंजताना तानाजींनी आपल्या प्राणांची बाजी लावली. अत्यंत निकराच्या लढाईत ते वीरगतीला प्राप्त झाले, परंतु गड जिंकला. तानाजींच्या बलिदानामुळे सिंहगडावर त्यांचे स्मारक आणि वीरगळ आहे, तसेच उमरठे येथेही स्मारक उभारले गेले आहे .
तानाजी मालुसरे हे त्यांच्या असीम निष्ठा, शौर्य आणि बलिदानासाठी मराठा इतिहासात ‘नरवीर’ म्हणून अजरामर आहेत.
फेब्रुवारी १६७० “कोंढाणा आला पण सह्याद्रीचा सिंह गेला” नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या ३५५ व्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!