स्मार्ट बुलढाणा

प्रा.भाग्यश्री उबाळे यांना आचार्य पदवी प्रदान

'शिक्षणशास्त्र' विषयात मिळाली पीएच.डी.

बुलढाणा,(प्रतिनिधी): संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बेचाळिसाव्या दीक्षांत समारंभात प्रा.भाग्यश्री विलास उबाळे यांना आंतरविद्याशाखेतील ‘शिक्षणशास्त्र’ या विषयात आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय “माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठीच्या कृती कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा अभ्यास” हा आहे.

शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलडाणा येथील प्रा. डॉ. नुतन भानुदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आचार्य (पीएच.डी.) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्यासाठी प्रा.भाग्यश्री विलास उबाळे या मार्गदर्शक व सर्व प्राध्यापक वृंदाच्या मनस्वी ऋणी आहेत. यापूर्वी प्रा.डॉ.भाग्यश्री विलास उबाळे यांनी युजीसी नेट, महाराष्ट्र सेट, महाराष्ट्र टीईटी पेपर १ व पेपर २, क्रीडा, संगीत अशा विविध परीक्षांमध्ये पहिल्याच प्रयत्नात पात्र होण्याचा बहुमान पटकाविला आहे. अमरावती विद्यापीठातून एम.एड. मधून प्रथम मेरिट व एम.ए. (इतिहास) विषयातून पाचवी मेरिट येण्याचा मानही मिळविला आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जनरल्स व कॉन्फरन्समध्ये त्यांचे विविध रिसर्च पेपर आणि आर्टिकल्स हे इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरावरील त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक अनेकदा विविध प्रसिद्ध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

प्रा.डॉ.भाग्यश्री उबाळे यांनी त्यांच्या यशाचे श्रेय वडील विलास उबाळे, आई शोभा उबाळे, भाऊ प्रशांत उबाळे, बहीण अश्विनी उबाळे, मामा प्रा. तुकाराम बाऊ तसेच सर्व प्राध्यापक वृंदांना दिले आहे. सध्या त्या कादरिया कॉलेज ऑफ एज्युकेशन (बुलडाणा) येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!