प्रहारची ‘धार’ अन् प्रशासनाची झाली ‘हार’!;धाड येथील आठवडी बाजारासाठी महामार्गावरच थाटली दुकाने; भरचौकात ठोकला उपोषण मंडप

अभिनय बोर्डे 

धाड, (प्रतिनिधी): मागील २८ वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या धाड येथील आठवडी बाजाराच्या प्रश्नावर आज ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ने छेडलेल्या आक्रमक आंदोलनासमोर अखेर जिल्हा प्रशासनाला झुकावे लागले. ऐन उन्हाळ्यात ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू करताच आणि व्यापाऱ्यांनी थेट छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दुकाने थाटल्याने प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर तहसीलदार आणि सहाय्यक बिडीओनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

१९९६ पासून धाड येथील आठवडी बाजार वाऱ्यावर आहे. ज्या जागेवर बाजार भरतो, त्या जागेचा वापर आठवडाभर नागरिक सार्वजनिक शौचालय म्हणून करतात. अत्यंत घाणीच्या साम्राज्यात आणि दुर्गंधीत बाजार भरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. कायमस्वरूपी जागा, निर्जंतुकीकरण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने बुलढाणा तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे आज संपाचा आणि संघर्षाचा पवित्रा घेण्यात आला. वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचे उप तालुका प्रमुख गणेश जाधव, चिखली तालुका प्रमुख सुनील वाघ, विभाग प्रमुख सोनू वाघ, शरप्रमुख सचिन नेमाने, युवा शहर प्रमुख अजय शिंदे, दिलीप उबाळे, नीलेश चिंचोले, शाम टाकसाळ, निलेश गुरव, दिलीप ठाकरे, ऋषी वाघ, राजू शिंदे, पवन बामदळे, वैभव कोप्पे, वैभव माळोदे, प्रवीण गुजर, विनोद ठाकरे, आरोग्य सेलचे तालुकाप्रमुख अनंत उबाळे, अरविंद गुजर, विष्णू घाडगे, स्वप्नील नेमाने, नितीन इंगळे, संतोष पवार, सागर गायकवाड, ज्ञानेश्वर माळोदे, उमेश घाडगे, संदीप खेडकर, विशाल मोरे, आशिष तोटे, शिवराज बोराडे, शुभम कुटे, गोपाल बोराडे, राजू ढोले , भिका केळोदे, अनिल तोटे, गजानन राऊत, रामू ठाकरे, गणेश ताठे, रामेश्वर ताठे, राजू भिंगारे, विठ्ठल शिंदे, वैभव सोनूने, विकास दांडगे, नीलेश मुठ्ठे, विश्वजित दांडगे, संजय उबाळे, नारायण नेमाने, विठ्ठल खेडकर, समाधान सरोदे, रमेश उबाळे, विनोद खेडकर, गजानन जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज ६ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून सकाळी दहा वाजता उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनाचे गांभीर्य ओळखून व्यापाऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चक्क धाड ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर लावली. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आणि प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली.

प्रशासनाची धावपळ आणि लेखी आश्वासन

आंदोलनाची तीव्रता आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहून बुलढाणा पंचायत समितीचे सहाय्यक बी.डी.ओ. ढोरे, विस्तार अधिकारी अरविंद टेकाळे आणि सरपंच सावित्रीबाई बोर्डे यांनी तातडीने उपोषणस्थळी धाव घेतली. त्यांनी जागेचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले. तसेच जागा उपलब्ध होईपर्यंत सध्याची बाजाराची जागेचे बाजाराच्या अगोदरच्या दिवशी निर्जंतुकीकरण करण्यात येईल, तत्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनीही स्वतः उपोषण मंडपाला भेट देऊन “ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त होताच जागा उपलब्ध करून दिली जाईल,” असे लेखी आश्वासन दिले.

तहसीलदारांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण स्थगित

“आम्ही रडणारे नाही, तर लढणारे आहोत. जोपर्यंत आमच्या हक्काची जागा मिळत नाही आणि येथील घाणीचे साम्राज्य संपत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. आज केवळ आश्वासनावर थांबलो आहोत, कृती न झाल्यास पुढचा संघर्ष अधिक तीव्र असेल, अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे वैभवराजे मोहिते यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!