छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): फुलंब्री तालुक्यातील निधोना गावात १५ एप्रिलच्या रात्री जे घडले, त्याने केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले आहे. एका २८ वर्षीय विवाहित महिलेने, जिचा संसार मयूर पार्कसारख्या भागात सुखाने सुरू होता, तिने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, या आत्महत्येमागील कारणे आणि समोर आलेली परिस्थिती पाहता, हा केवळ प्रेमाचा त्रिकोण आहे की ‘लव्ह जिहाद’च्या नियोजित जाळ्याचा हा भयानक अंत आहे? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
समीर खान नजीर खान नावाच्या तरुणाने एका दोन अपत्ये असलेल्या विवाहितेच्या आयुष्यात प्रवेश केला. चित्रा (नाव बदललेले) विवाहित आहे, तिला मुले आहेत, हे माहित असतानाही समीरने तिला आपल्या जाळ्यात का ओढले? तिने वारंवार नकार देऊनही तिला वारंवार कॉल करणे आणि पतीपासून तोडणे, हा एका विशिष्ट मानसिकतेचा भाग तर नव्हता ना? ज्या पद्धतीने तिला माहेरी येण्यास आणि शेवटी विहिरीपर्यंत जाण्यास प्रवृत्त केले गेले, त्यावरून हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’च्या छुप्या अजेंड्याकडे तर निर्देश करत नाही ना? असे अनेक प्रश्न एफआयआरमधील माहितीवरून निर्माण होत आहेत.
तो ‘कॅल्क्युलेटेड’ विश्वासघात होता का?
घटनेच्या रात्री आई-वडिलांनी दोघांना रंगेहात पकडल्यानंतर समीरने जे शब्द उच्चारले, ते सर्वात धक्कादायक आहेत. “तू और हम मर जायेंगे, यह जमाना अपने को साथ नहीं रहने देगा, चल कूद…”, असे म्हणणारा समीर, गायत्रीने उडी मारताच स्वतः का पळून गेला?, जर त्याचे प्रेम खरे होते, तर त्यानेही उडी का घेतली नाही?, स्वतःला वाचवण्यासाठी तो अंगावर कपडे नसतानाही, आपली दुचाकी आणि मोबाईल सोडून पळ काढतो, यावरून त्याने तिला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा प्लॅन आधीच केला होता का?, एका हिंदू महिलेला अशा प्रकारे विहिरीपर्यंत नेऊन स्वतः सुरक्षित राहणे, हा ‘लव्ह जिहाद’मधील फसवणुकीचा एक प्रकार असू शकतो का?, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.
कायद्याचा पेच आणि समाजाचे प्रश्न
वडोद बाजार पोलिसांनी समीर खानला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गायत्रीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत ज्या बाबी नमूद केल्या आहेत, त्या पाहता केवळ ‘आत्महत्या’ म्हणून याकडे पाहावे की एका कुटुंबाचा पद्धतशीरपणे केलेला विनाश म्हणून? एका सुसंस्कृत संसाराची राखरांगोळी करणारा समीर खान हा केवळ एक गुन्हेगार आहे की एका मोठ्या जाळ्याचा भाग? हिंदू समाजातील विवाहित स्त्रियांना लक्ष्य करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे सत्र कधी थांबणार?, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
समीरच्या क्रूरतेची साक्ष
निधोना येथील विहिरीच्या काठावर सापडलेली एमएच-२०-एफएच-७८३४ क्रमांकाची समीरची स्कुटी आणि त्याचे कपडे हा त्याच्या गुन्ह्याचा पुरावा आहेच, पण ते गायत्रीच्या भाबडेपणाची आणि समीरच्या क्रूरतेची साक्ष देत आहेत. पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तपासात ‘लव्ह जिहाद’चे हे कनेक्शन किती खोलवर आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, तोपर्यंत एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे अजून किती माता-भगिनी अशा फसव्या ‘जिहादी’ जाळ्यात आपला बळी देणार?