गाडेगाव मोहल्ला येथे गणपती आरतीदरम्यान ताट फेकून दिल्यामुळे तणाव; चौघांविरुध्द गुन्हा दाखल

अजय टप 

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):येथील गाडेगाव मोहल्ला, मंगलगेट परिसरातील प्रतापगणेश मंडळात २२ सप्टेंबर रोजी रात्री गणपतीची आरती सुरू असताना एका इसमाने त्याच्या तीन अज्ञात साथीदारांसह येऊन हुज्जत घातली. त्यांनी धार्मिक भावना दुखावणारी विधाने करत आरतीचे ताट फेकून दिले. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला असून, परिसरात काही काळ पळापळी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी विक्रमसिंह चतरसिंह राठोड रा.गाडेगाव मोहल्ला मलकापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी साजीद अहमेद खान रा. बारादरी, मलकापूर व त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून मलकापूर टाऊन परिसरात फिक्स पॉईंट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या शहरात पूर्णपणे शांतता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!