क्राईम जगत

153

६० हजार रुपये दंडही ठोठावला

      मलकापूर (प्रतिनिधी) :- अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस आजन्म कारावास व ६० हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा वर्षे सक्त मजुरीची सजा देण्याचा आदेश आज २० डिसेबर रोजी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. बी. जाधव यांनी दिला.मलकापूर येथील अल्पवयीन बालकाला नळगंगा नदीच्या पात्रात नेऊन त्याचे वर लैंगिक अत्याचार व जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. यावरून पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे आरोपी हमीद खान सिकंदर खान (रा. मलकापूर) याच्या विरुद्ध भादंवीचे कलम ३०७, ३७७ सह कलम ४,५(आय), ५ (एम), ५ (आर), ६ सहवाचनिय बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को ॲक्ट) नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस उप निरीक्षक संजीवनी पुंडगे यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सुनावणी पुर्ण होउन पिडीत मुलगा व आई-वडील, डॉक्टर, तसेच इतर साक्षीदार व तपास अधिकारी, असे एकुण १८ साक्षीदार सरकारपक्षातर्फे अभियोक्ता सरकारी शैलेश हरिहर जोशी यांनी तपासले. त्यांच्या पुराव्यानंतर आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने सदर प्रकरणात अंतिम युक्तीवाद होवून सरकार पक्षातर्फे ॲड. शैलेश हरिहर जोशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस भा.द.वि.चे कलम ३०७ नुसार जन्मठेप व दहा हार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास. तसेच कलम ३७७ नुसार १० वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को ॲक्ट) कलम ४ नुसार जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच ५ (आय) सहवाचनिय ६ नुसार आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच ५ (एम) सहवाचणीय ६ नुसार आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास. तसेच ५ (आर) सहवाचनीय कलम ६ नुसार आजन्म कारावास व दहा रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास शिक्षा दिली आहे. दंडाची रक्कम वसूल झाल्यावर पीडित मुलास नुकसान भरपाई रक्कम ६९ हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे. सदरच्या प्रकरणात पैरवी अधिकारी संतोष कोल्हे, पोउपनि पुंडगे व पोलीस अंमलदार जाधव यांनी पैरवी म्हणून काम केले.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!