राजकारण

नोटा उधळणे भोवले! मलकापूरच्या नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल

समाजमाध्यमांवर व्हिडीओ झाला होता व्हायरल; आठ दिवसानंतर गुन्हा दाखल

                            अजय टप
            मलकापूर,(प्रतिनिधी): नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी झाल्यानंतर विजय उत्सव साजरा करताना नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवाराने नोटा उधळल्या होत्या. त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ही घटना आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असल्याने आज २९ डिसेंबर रोजी मलकापूर शहर पोलिसांत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शपथग्रहण कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला गुन्हा दाखल झाल्यामुळेच चांगलीच खळबळ उडाली आहे.
         नगर परीषद सार्वत्रिक निवडणुक-२०२५ ची २१ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली अन्झाi निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. सदर निकाल जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार अतिक जवारीवाले यांनी २१ डिसेंबरच्या सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मलकापूर शहरातील लोखंडी रेल्वे पुलाजवळ पारपेठकडील बाजूस आपल्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्यासह विजय उत्सव साजरा केला होता. नव्हेतर अतिक जवारीवाले यांनी स्वत: नोटा उधळल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांचे हे कृत्य सचिव राज्य निवडणूक आयोग (महाराष्ट्र राज्य) यांच्या नगर परीषद निवडणुक सन-२०२५ च्या आदर्श आचार संहिताचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोपी करीत विठ्ठल बाळासाहेब भुसारी (उपमुख्याधिकारी, नगर परिषद मलकापूर) यांनी मलकापूर शहर पोलिसांत फिर्याद दिली होती.
       दरम्यान, मलकापूर शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अतिक जवारीवाले यांच्याविरुध्द मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे हे करत आहेत. या घटनेमुळे निवडणूक काळातील आचारसंहितेच्या पालनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन व पोलिसांची पुढील कारवाई काय होते?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!