स्मार्ट बुलढाणा

बुलढाण्यातील ‘ते’ लाभार्थी भाऊ, की लाकडी बहीण?

४५० भाऊ लाडकी बहीण बनल्याचा संशय; लाभार्थ्यांच्या पडताळणीला सुरुवात

  डोणगाव, (प्रतिनिधी)
.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची एक महत्वाची योजना असून ऑगस्ट २०२४ पासून ती लागू झालेली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचे आरोग्य व पोषण सुधारणे आणि कुटुंबात त्यांची भूमिका मजबूत करणे, या योजनेचा उद्देश आहे. या याजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बॅंक खात्यात दरमहा १ हजार ५०० जमा केले जातात. मात्र, आपल्या आधार कार्डवर लिंग व नावात बदल करुन काही पुरुषांनी देखील या याजनेचा फायदा घेतला असून महिला व बालविकास विभाकडून त्यांची पडताळणी सुरू झाली आहे. शासनाची फसवणूक करुन लाभ घेतल्याचे पडताळणीत सिध्द झाल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात ६ लाख ७१ हजार १८३ महिला पात्र लाभार्थी होत्या. यामध्ये एका राशन कार्डवर जास्त महिलांनी लाभ घेणे, ६५ वर्षापेक्षा वय जास्त होणे, उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त राहणे, नोकरदार महिला, अशा ३० हजार ४०३ महिलांचा लाभ बंद करण्यात आला. त्यामुळे सद्या या योजनेमध्ये पात्र लाभार्थी ६ लाख ४० हजार ८७९ महिला असून यापैकी ४५० लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणे हे लाभार्थी पुरुष असल्याची बाब समोर आली आहे. या ४५० लाभार्थ्यांचा लाभ तूर्तास बंद करण्यात आला असून महिला व बालविकास विभागामार्फत त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीनंतर सदर लाभार्थी महिला व आधारवर चुकीने पुरुष लिहिल्या गेले असल्यास त्यांना आधार अपडेट करून, त्यांचा लाभ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. तर दुसरीकडे लाभार्थी हा पुरुष असून त्याने महिला म्हणून लाभ घेतला असल्यास त्याला कारवाईचा सामना करावा लागणार.
मेहकर तालुक्यातील जवळा व जानेफळ येथील काही पुरुषांनी यापूर्वी महिला म्हणून या योजनेचा लाभ घेतला होता. तर महिला बाल विकास कार्यालयाच्या यादीमध्ये मेहकर तालुक्यात ४४ लाभार्थ्यांचे आधार कार्ड पुरुषांचे निघाले आहेत. तसेच त्यांनी योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांची पडताळणी करण्या येत आहे. यामध्ये पुरुष असतांना लाभ घेतल्याचे आढल्यास त्यांना सदर लाभ परत करावा लागणार आहे.तर दुसरीकडे लाभार्थी ही महिला असून आधारवर चुकीने पुरुष झालेले असल्यास त्यांना आधार अपडेट करून घेतल्यानंतर त्यांचा लाभ पुर्वरत सुरू करण्यात येणार आहे

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!