Uncategorized
शिक्षिकेची आत्महत्या; कन्नड हादरले!

कन्नड (प्रतिनिधी) :
मेहगावच्या जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेने घरातील छताच्या सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कन्नड शहरातील श्रीरामनगरमध्ये नुकतीच समोर आली. वैशाली राजेश शेलार (वय ४७ वर्षे) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.
कन्नड शहरातील श्रीरामनगरमध्ये वास्तव्यास असलेली वैशाली आणि पती राजेश शेलार हे दोघेही मेहगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहेत. तर त्यांचा मुलगा पुणे येथे शिक्षण घेत आहे. २४ डिसेंबरच्या सकाळी शिक्षिका वैशाली यांनी पुणे येथे शिकणाऱ्या आपल्या मुलाच्या बँक खात्यावर ७५ हजार रुपये पाठवले. आईने अचानक पैसे पाठवल्याने मुलगा चकित झाला. आणि त्याने वडिलांना कॉल करून सांगितले. त्यानंतर सकाळी दहा वाजताच्या सुमारास घरी कोणी नसताना वैशालीने घराच्या छताला असलेल्या सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. थोड्या वेळानंतर राजेश शेलार घरी आले असता, त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. नातेवाईक व शेजाrऱ्यांच्या त्यांनी व शेजाऱ्यांच्या त्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी वैशाली फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या.त्यांनी लगेचच त्यांना फासावरून काढून कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा गीते यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटस्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा केला. या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून वैशालीने आत्महत्या केली,याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. वैशाली यांच्या पश्चात पती, मूलगा, मुलगी, जावई, नातू असा आप्त परिवार आहे.


