क्राईम जगत
वडनेर भोलजीच्या अवैध बियोडिझेल पंपावर धाड

नांदुरा,(प्रतिनिधी) :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडनेर भोलजी शिवारातील जम्मू हिमाचल पंजाबी ढाब्याच्या पाठीमागील अवैध बियोडिझेल पंपावर पुरवठा विभागाने २३ डिसेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास धाड घातली. या कारवाईत बायोडिझेलसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील रोडलगत वडनेर भोलजी शिवारातील जम्मू हिमाचल पंजाबी ढाबाच्या पाठीमागे मोकळ्या शेतामध्ये बोलेरो वाहन पिकअप (क्रमांक एमएच-२८-एच-९९१२) मध्ये असलेले ७५ हजारांचे एक हजार लिटर बायोडिझेल, डिस्पेन्सर युनिट मशीन नोझल, पाइप, प्लास्टिक टाकी असा दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बोलेरोच्या चालक-मालकाने वाहनामध्ये ज्वलनशील असलेला डिझेलसदृश पेट्रोलियम द्रव्य पदार्थ असुरक्षितरित्या व बेवारस स्थितीत विनापरवाना तसेच इतरांच्या जीवनात धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याने पुरवठा निरीक्षण अधिकारी सुधीरकुमार गायकवाड यांनी तक्रार दिली. त्यानुसार नांदुरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.



