क्राईम जगत

पोलिसाच्या खुनाचे रहस्य उलगडले!

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी) : देवगाव रंगारी (ता. कन्नड) पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस अंमलदारांची त्यांच्या मूळ गावी निर्घण हत्या करण्यात आली होती. खुनानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह घराशेजारीच पुरला. प्रकरणी शिऊर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. सुरुवातीला अनैतिक संबंधातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. मात्र, गुन्ह्याचा सखोल तपासात ही हत्या भाऊबंदकीतून नानासाहेबांच्या सख्या भावानेच केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस अंमलदार नानासाहेब दिवेकर हे १ जानेवारी रोजी आपल्या वृद्ध वडिलांना भेटण्यासाठी मूळ गावी बळ्हेगाव (ता. वैजापूर) येथे गेले होते. २ जानेवारीच्या सकाळपर्यंत ते सर्वांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर अचानक त्यांचा फोन बंद झाला. नानासाहेब पोलीस स्टेशनलाही गैरहजर आणि कुटुंबीयांशीही संपर्क तुटल्याने मुलाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शिऊर पोलिसांनीही तपासला गती देत बळ्हेगाव येथील त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातील पलंगाखाली नानासाहेबांचा मोबाइल ‘फ्लाईट मोड’वर आढळून आला. तसेच घराच्या शेजारच्या मोकळ्या जागेत नानासाहेबांचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत मिळून आला.
मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन संशयितांना ताब्यात घेतले. सर्वांची कसून चौकशी करण्यात आली. नानासाहेबांच्या भाऊबंदाचे जबाब नोंदविण्यात आले असता, त्यामध्ये तफावत दिसून आली. नव्हेतर पोलीस खाक्या दाखवताच यातील लहानु रामजी सातदिवे (दिवेकर) यानेच कौटुंबिक वादातून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, पवन डंगळे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, केतन उगले, पोलीस अंमलदार प्रमोद पाटील कासम शेख, सचिन राठोड, सुनिल गोरे, विष्णू गायकवाड यांनी तपास करून उपरोक्त गुन्हा उघडकीस आणला.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!