क्राईम जगत

खळबळजनक! प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला

प्रियकराचे लिव्ह-इन रक्ताळललं

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी) : जगापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीला बगल देत पाश्चिमात्य संस्कृतीचे केलेले अनुकरण आणि वयाचा अपरिपक्वपणात घेतलेला निर्णय कसा घातक ठरू शकतो, याचा प्रत्यय नुकताच पुंडलिकनगरवासियांना आला. गेल्या चार वर्षांपासून ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने नाते तोडल्याच्या राग अनावर झाल्याने संतापलेल्या प्रियकराने धारदार शस्त्राने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. नुकत्याच समोर आलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
फुलंब्री (जि.छत्रपती संभाजीनगर) तालुक्यात एका गावात सध्या इयत्ता १२ मध्ये शिक्षण घेणाऱ्या पीडितेची ती १४ वर्षांची असताना कृष्णा शेषनारायण उदावंत (वय २८ वर्षे) रा. अजिंक्यनगर) याच्यासोबत ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दिवसेंदिवस हे प्रेम चांगले बहरले. प्रेमात आंधळी झालेल्या अल्पवयीन पीडितेने आपल्या कुटुंबाला त्यागून कृष्णासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल चार वर्षांप तिने त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी पीडिता आणि कृष्णामध्ये वाद झाल्याने कृष्णाला सोडचिठ्ठी देऊन ती पुंडलिकनगरस्थित तिच्या आईच्या घरी राहायला आली.
दरम्यान, ४ जानेवारी रोजी कृष्णा अचानक पीडितेच्या आईच्या घरी प्रकटला. ‘तू माझ्यासोबत चल’,असे म्हणत पीडितेसोबत वाद घातला. तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने या प्रेमविराणे सोबत नेलेला चाकू स्वतःच्या गळ्याला लावून आत्महत्येची धमकी देत भावनिक ब्लॅकमेल करू लागला. मात्र, पीडिता धमकीला भीक घालत नसल्याने त्याचा राग अनावर झाला आणि त्याने पीडितेवर धारदार शस्त्राने वार केला. तसेच जीवने मारून टाकण्याची धमकी देत घटनास्थळावरून पसार झाला. पीडितेपार रुग्णालयात उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.
याप्रकरणी जखमी पीडितेने पुंडलिकनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कृष्णा उदावंत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार केशव कासारे हे करीत आहेत. नात्याची समज नसताना भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय आयुष्याला किती घातक ठरू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!