स्मार्ट बुलढाणा

धोडपच्या शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला!

चिखली,(प्रतिनिधी): जवळच असलेल्या धोडप येथील अल्पभूधारक शेतकरी उत्तम बळीराम परिहार हे शेतामधे गेले असता, त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केल्याची घटना ६ जानेवारीच्या दुपारी १ वाजताच्या सुमारास घड़ली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
धोडप येथील रहिवासी असलेले उत्तम परिहार हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी आपल्या शेतात हरभरा, गहू, तूर पेरणी केली आहे. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी ते ६ जानेवारीच्या दुपारी शेतात गेले होते. त्यावेळी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला चढवला. या हल्ल्यात उत्तम परिहार जखमी झाले. हल्ल्याची माहिती मिळताच धोडप सरपंच प्रदीप कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन उत्तम परिहार यांना रुग्णवाहिकेव्दारे बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अशा घटना घडू नये, यासाठी वन प्रशासनाने जंगली प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करवंड, धोडप,पळसखेड सपकाळ येथील गावकऱ्यांनी केली आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!