क्राईम जगत

अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले

दसरखेड टोलनाक्यावरील कारवाई; एकावर गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी):अवैध वाळू वाहतूकदारांचा कर्दनकाळ ठरलेल्या दयरखेड एमआयडिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांनी दसरखेड टोलनाका परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडल्याची घटना ७ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी टिप्पर जप्त केले असून एकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

दसरेखड एमआयडिसी पोलीस स्टेशन हद्दित मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूकीचे ठिय्ये आहेत. दररोज शेकडो ब्रास रेतीची या ठिकाणावरुन अवैध वाहतूक होत असते. मात्र, पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर यांनी दसरखेड एमआयडिसी पोलीस स्टेशनचा पद्भार स्विकारताच वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याची मोहिम सुरु केली. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी केलेली मोठी कारवाई चर्चेत असतांनाच, ७ जानेवारीच्या मध्यरात्री एका टिप्परव्दारे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पेंदोर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पेंदोर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार विजय टेकाडे,संदीप कळसक यांनी दसरखेड टोलनाक्यावर नाकाबंदी केली. त्यावेळी संशयित अशोक लेलँड कंपनीचा १२१५ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा टिपर क्रमांक एमएच-२८-बीबी-८३९२ पोलिसांच्या दिशेने येताना दिसला. पोलिसांनी सदर टिप्पर थांबवून चालकाची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव रोशन तेजराव मुंडाळे, असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी टिप्परची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन ब्रास वाळू मिळून आली. तसेच चालकाककडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी टिपर वाहन (किंमत १३ लाख रुपये) व दोन ब्रास वाळू (किंमत २० हजार रुपये), असा एकूण १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उपरोक्त आरोपीविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२),सहकलम २१(१)२१(२) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!