क्राईम जगत

मेहकरात दिवसा घरफोडी! रात्रच नव्हे दिवसही चोरट्यांचा

मेहकर,(प्रतनिधी): रात्रपाळीला होणाऱ्या चोऱ्या एखादवेळी समजण्यासारख्या आहेत. मात्र, दिवसाढवळ्या जर घरफोडी होत असेल, तर आता रात्रच नाही, तर दिवसही चोरट्यांचाच, असे म्हणण्याची वेळ मेहकरवासीयांवर आली आहे. त्याचे कारण म्हणजे, आज ८ जानेवारीच्या दुपारी दोन वाजता शहरातील शिक्षक कॉलनीत चोरट्यांनी दिवसा ढवळ्या घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह एक हजार रुपये रोख, असा ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटेनमुळे नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत पसरली असून चोरट्यांवर स्थानिक पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे बोलल्या जात आहे.

हशरातील शिक्षक कॉलनीत रहिवासी असलेले जी.डी.राठोड यांनी त्यांचे घरात सिध्दू पवार नामक भाडेकरुन ठेवलेले आहे. आज ८ जानेवारी रोजी पवार यांच्या पत्नी मैत्रिणीसोबत बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या घरी कोणी नसल्याचे हेरुन अज्ञात चारेट्यांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच अर्धा तास घराचा ढुंडाळा केला. घरातील कपाटाला कुलूप नसल्याने चोरट्यांनी सदर कपाट उघडून त्यातील अंदाजे तीन ग्राम सोन्याचे कानातील फुले व एक हजार रुपये रोख, असा एकुन ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. पवार यांच्या पत्नी अर्ध्यातासानंतर घरी पतल्यानंतर त्यांना घराच दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता, आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शहरात गेत काही महिन्यांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात शिक्षक कॉलनी, पवनसूत नगरसह शहरातील विविध ठिकाणी चोऱ्­यांच्या घटना घडल्या आहेत. यावरुन चोरट्यांना मेहकर पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे नागरिक बोलत आहेत. चोरट्यांच्या या धुमाकूळामुळे तर पवनसूत नगरातील नागरिकांनी पोलिसांच्या भरवशावर न राहता गृप तयार करून रात्रीचा पहारा देणे सुरू केले आहे. मात्र, रात्री तर रात्री आता दिवसाढवळ्याही घरफोड्या होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!