स्मार्ट बुलढाणा
विज्ञान प्रदर्शनात जि.प.शाळा डोंगरखंडाळाच्या शिक्षक सय्यद जमिल यांची बाजी
मनोरंजक गणितीय मॉडेल साहित्यास जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक

गणेश काकडे
डोंगरखंडाळा,(प्रतिनिधी) : शिक्षण विभाग जिल्हा परिषद (बुलढाणा), जिल्हा विज्ञान संघटना (बुलढाणा) व विवेकानंद विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज (हिवरा आश्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या ५३ व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत जि.प.शाळा डोंगरखंडाळाच्या शिक्षक सय्यद जमिल यांची बाजी मारली असून त्यांच्या मनोरंजक गणितीय मॉडेल साहित्यास जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.
५३ व्या बुलढाणा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये बुलढाणा जिल्हयातील सर्व तालुक्यातून प्रथम ,द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी प्राथमिक व माधामिक गट तथा तालुक्यात शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेले शिक्षक सहभागी होत असतात. शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा (डोंगरखंडाळा) येथील शिक्षण सय्यद जमिल सय्यद बशीर यांनी तयार केलेले मनोरंजक गणितीय मॉडेल या साहित्यास जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांची निवड आता नागपूर येथे होऊ घातलेल्या राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनात झाली आहे.
दिनाक ६ व ७ जानेवारी २०२६ रोजी विवेकानंद विद्यामंदिर व ज्यूनियर कॉलेज (हिवरा आश्रम ता.मेहकर) येथे हे विज्ञान प्रदर्शन पार पडले. बक्षीस वितरण समारंभात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पाटील, डाएटचे प्राचार्य भटकर, उपशिक्षणाधिकारी मुंडे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक श्रीमती उबरहंडे, विज्ञान संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा संघटनेचे सदस्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल शा.व्य.स.अध्यक्ष गणेश काकडे, डोंगरखंडाळा ग्रापंचयत सरपंच प्रजाताई कांबळे, उपसरपंच श्याम सावळे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल चव्हाण, माजी तंटामुकी अधक्ष गजानन सावळे, शा.व्य.समिती सदस्य, ग्रामपंचाय सर्व सदस्य तथा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सय्यद यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या मुख्याधापिका पुष्पा गुळवे, जेष्ठ शिक्षक आराख,जाधव, शिक्षिका आराख, शिक्षक जाधव यांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे यश संपादन करू शकलो, असे प्रतिपादन करत भविष्यात आपल्या शाळेच्या विद्यार्यांना देखील राज्य स्तरापर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



