स्मार्ट बुलढाणा

राष्ट्रीय महामार्ग-५३ वर पुन्हा अपघात!

दसरखेड लगतची घटना; दोन तरुण गंभीर

मलकापूर,(प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर म्हणजे मलकापूर-मुक्ताईनगर दसरखेड लगत साईड रस्ता नसल्याने पुन्हा एक अपघाताची गंभीर घटना आज १० जानेवारीच्या सायंकाळी ६ वाजता घडली. दोन दुचाकींची समोरासमोर येऊन त्यांची धडक झाल्याने ही घटना घडली. यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

शासनाने या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, हे करत असताना दसरखेड गावालगत महामार्गावर आवश्यक साईड रस्ता ठेवला नाही. त्यामुळे या ठिकाणी कायम अपघात होत आहे. आज १० जानेवारी रोजी सायंकाळी वाजता दोन दुचाकी आमने-सामने धडकल्या. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी या कडेवरून त्या कडेला जाऊन पडल्या आणि दुचाकीस्वार दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याने जाणारी खासगी ऑटोरिक्षा थांबवून दोन्ही जखमींना रिक्षाच्या माध्यमातून तात्काळ मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!