क्राईम जगत

ॲलर्ट! पतंग उडवणाऱ्यांवर “संक्रांत” 

नायलॉन मांजा वापर करणाऱ्याला २५ हजार:तर विक्री विक्रीकरणाऱ्याला अडीच लाखांचा दंड

बुलढाणा,(प्रतिनिधी) : आपल्याकडे दरवर्षी मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवानिमित्त अबालवृद्ध सर्वचजण पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. मात्र, यंदा संक्रांतीच्या या उत्सवात पतंगबाजीचा आनंद लुटताना सावधानता बाळगावी लागणार आहे. उडवण्यात येणाऱ्या पतंगासाठी ‘नायलॉन मांजा’चा वापर करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नायलॉन मांजाच्या वापराविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर पाऊले उचलली असून उचलले असून, हा जीवघेण्या मांजा वापरणाऱ्यांवर २५ हजार तर साठा किंवा विक्री करणाऱ्यांवर अडीच लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याचा आदेश दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘Suo Motu Public Interest Litigation No. 1 of 2021’ अंतर्गत जिजाऊ जयंतीदिनी म्हणजे १२ जानेवारी २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या आदेशानुसार आता नायलॉन किंवा सिंथेटिक मांजावर पूर्णतः बंदी घातली आहे. या मांजामुळे दरवर्षी अनेक नागरिक गंभीर जखमी होतात, तर बहुतांश नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करून उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाला नायलॉन मांजा वापर आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

उच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार खालील प्रमाणे दंडाची तरतूद करण्यात आली असून नायलॉन मांजा वापरून जर कोणी व्यक्ती पतंग उडवताना आढळून आली, तर त्या व्यक्तीला २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे पतंग उडवणारी व्यक्ती अल्पवयीन असल्यास सदर दंड त्याच्या पालकांकडून वसुलल्या जाणार आहे.

बंदी असलेल्याच याच नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा करणाऱ्या विक्रेत्यांवरही आता पूर्वीपेक्षा कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली असून विक्रेत्यांवर यापुढे दोन लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सदर दंडाची रक्कम तात्काळ न भरणाऱ्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जमीन महसुल कराप्रमाणे रक्कम वसूलची कारवाईत करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या नावाने असलेल्या “Public Welfare Account” मध्ये जमा होणार असल्याने तिचा विनियोग नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या पीडिताचा उपचार, तसेच त्यांच्या आर्थिक मदतीसाठी केला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी सावधान होण्याची गरज असून जो कोणी नियमांचे उल्लेखन करतांना आढळेल,त्याच्यावर दंडातमक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी दिला आहे.

 

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!