क्राईम जगत

वासनांध शिक्षकाचा पाच चिमुरड्यांवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; नराधम शिक्षक जेरबंद

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिध): शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर आणि शिक्षक म्हणजे देवाचे रूप समजल्या जाते. याच देवरूपी शिक्षकाच्या विश्वासावर पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात.मात्र, तोच शिक्षक जर भक्षक बनत असेल, तर पालकांनी आपल्या पाल्यांची सुरक्षितता शोधायची तरी कुठे?, असाच एक समाजाला अंतर्मुख करणारा प्रश्न तथा संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. सिडको एमआयडीसी परिसरातील एका खासगी शाळेच्या एका वासनांध शिक्षकाने सतत दोन वर्षे अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला. ही घटना केवळ एक शाळा किंवा शिक्षकाची नसून संपूर्ण समाजासाठी चिंतेची बाब आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एमआयडीसी परिसरातील एका खासगी शाळेत २०१४ पासून आरोपी खाजी मूजिबोद्दीन नसीरोद्दीन (वय ४० वर्षे) हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेत येताना हा शिक्षक नेहमी गुटखा खाऊन असायचा. २०२४ ते २०२६ दरम्यान या शिक्षकाने वर्गातील सहावी आणि सातवीत शिकणाऱ्या १४ ते १५ वयोगटातील पाच विद्यार्थिनींना आपले लक्ष्य केले. लैंगिकतेने पछाडलेला आरोपी शिक्षक या मुलींना जाणीवपूर्वक त्रास द्यायचा. त्यांना वर्गात उभे करून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा. या भामट्याने त्यांचा केवळ लैंगिक छळच केला नाहीतर, ‘धार्मिक प्रार्थना का करत नाही?’, असे कारण काढून त्यांना बेदम मारहाण करायचा.

दहशतीखाली असलेल्या या चिमुरड्यांनी दोन वर्षे त्याच्या नरक यातना सहन केल्या. मात्र, त्याच्या सततच्या छळामुळे मुलींच्या वागण्यात झालेला बदल,त्यांच्या मनात कायम असणारी भीती बघून पालकांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता, या नराधम शिक्षकाचे पाशवी रूप समोर आले. या कोवळ्या मुलींनी आपल्यासोबत घडलेला प्रत्येक घृणास्पद प्रकार पालकांसमोर कथन केल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली. पालकांनी शाळेत धाव घेत सदर बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापिकेने तातडीने पावले उचलत आरोपी शिक्षकाला नोटीस बजावली. मात्र, हा मग्रूर सैतान गैरहजर चौकशीला राहिला. त्यामुळे शालेय प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली.

याप्रकरणी मुख्याध्यापिकेने सिडको एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी खाजी मूजिबोद्दीन नसीरोद्दीन (वय ४० वर्षे) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे ह्या करत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!