राजकारण
छत्रपती संभाजीनगरमध्ये लाठीचार्ज; माजी महापौरांसह ४ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनांमध्ये सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान आज १६ जानेवारी रोजी मोठा राडा झाला. शासकीय तंत्रनिकेतनाच्या मतमोजणी केंद्राबाहेरील पोलिसांच्या लाठीमारात शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन यांच्यासह चार कार्यकर्ते जखमी झाले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील ४ केंद्रांवर आज १६ जानेवारीच्या सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली. मात्र, शासकीय तंत्रनिकेतन केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी आतमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे होते त्यावेळी वादाची ठिणगी पडली. मार्केट आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. वाद वाढतच असल्याचे पाहून पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. या लाठीमारात माजी महापौर विकास जैन, उमेदवार राज राजपूत यांचे चिरंजीव रक्ताळलेल्या अवस्थेत केंद्राबाहेर पडले. उपस्थितांनी जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यानंतर पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर तगडा पोलीस बंदोबत तैनात करण्यात aala असून मतदान केंद्राला छावणीचे स्वरूप आले आले. अधिकृत ओळखपत्रे सोबत असूनही पोलिसांनी प्रतिनिधींना आत सोडण्यास मज्जाव केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून येत असून कारवाईची मागणी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कार्यकर्त्यांची रक्तबंबाळ अवस्था पाहून त्यांचा पारा चढल्याने त्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना फोन लावून कडक शब्दात जाब विचारला. “प्रतिनिधींकडे आयकार्ड असताना बळाचा वापर करणे हा शुद्ध मस्तवालपणा असल्याचे खडवसाले. तसेच या घटनेत दोषी असलेल्या पोलीस अधिकारी देशमुख यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. घटनेनंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनीही घटनास्थळी भेट दिली.



