खेळ व मनोरंजन

बुलढाण्याच्या म्हस्के कुटुंबात “हिमालयान”चा डॅश! 

जिल्ह्यातील पहिली रॉयल एनफील्ड हिमालयान पत्रकार अनिल म्हस्के यांच्या दारात

बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या आक्रमक शैलीने ओळख निर्माण करणारे “व्हॉईस ऑफ मीडिया”चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा दैनिक “पुण्यनगरी”चे जिल्हा प्रतिनिधी अनिल म्हस्के यांनी आता साहित्यासोबतच साहसाच्या क्षेत्रातही एक नवा पायंडा पाडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पहिली रॉयल एनफील्ड “हिमालयान” ही रायडर बाईक आणण्याचा बहुमान त्यांनी पटकावला असून त्यांच्या या नव्या “स्वारी”ची जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पत्रकार अनिल म्हस्के हे केवळ लेखणीच्या माध्यमातूनच नव्हे, तर आपल्या अनोख्या कामाच्या धडाक्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पत्रकार असो, किंवा सामान्य नागरिक, यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आपल्या लेखणीतूनच नाहीतर अनोख्या अंदाजात मार्गी लावणे, ही त्यांची खासियत आहे. त्याच्या या कार्याला आता अधिक वेग देण्यासाठी त्यांनी डोंगर-दऱ्या गाजवणारी “हिमालयान” ही शक्तिशाली बाईक निवडली आहे.
विशेष म्हणजे, ही अत्याधुनिक फिचर्स असलेली “हिमालयान” बाईक बुलढाणा जिल्ह्यात आणणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. रायडिंगच्या दुनियेत मानाचे स्थान असलेल्या या गाडीमुळे म्हस्के यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या या नव्या बाईकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, पत्रकारिता क्षेत्रातून आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. “आता लेखणीसोबतच हिमालयानचा वेग जिल्ह्याच्या विकासासाठी धावेल,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले जात आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!