क्राईम जगत

मलकापूर हादरले! १२ वर्षीय मुलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार

पवित्र नाते नासवणारा आरोपी जेरबंद

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): आपल्या आत्याच्या घरी गेलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच आत्या भावाने वारंवार अत्याचार केल्याचा पवित्र नात्याला काळिमा फासणारा, अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार मलकापूर शहरात समोर आला आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत विकृत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असलेली पीडिता गेल्या काही महिन्यांपासून शिक्षणासाठी मलकापूर येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या आपल्या आत्याकडे वास्तव्यास होती. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पीडितेची आत्या कामासाठी घराबाहेर गेल्याचे हेरून आरोपी रोहित (वय २५ वर्षे) याने पीडित मुलीच्या हतबलतेचा फायदा घेतला. पीडिता घरात झोपलेली असताना आरोपी रोहितने तिला जवळ ओढून तिच्यावर जबरदस्ती केली. पीडितेने या कृत्याला विरोध केला असता, आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच “जर ही बाब कोणाला सांगितली तर जीवाने मारून टाकीन,” अशी धमकी दिली. घाबरलेल्या पीडितीने ही बाब भीतीपोटी कोणालाही सांगितली नाही.
त्यामुळे आरोपीचे चांगलेच धाडस वाढले आणि त्याने पुन्हा १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता आणि २३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता, पीडिताला घरात एकटे पाहून पुन्हा तिला लैंगिकतेचे शिकार बनवले. आरोपीच्या सततच्या दहशतीखाली असलेल्या पीडितेने अखेर हिम्मत करून घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीची आपबिती ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. नव्हेतर त्यांनी २६ जानेवारी रोजी रात्री मलकापूर शहर पोलिसांत धाव घेऊन दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोहित विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४ (२)(M), ६५ (१), ३५२ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६ व ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे हे करीत आहेत. दरम्यान,पोलिसांनी आरोपी रोहितला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!