स्मार्ट बुलढाणा

काळाची झडप: दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

आरोपी वाहन चालक फरार; नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप
नांदुरा: दोन दुकानांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एका ४० वर्षीय मजुराच्या भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री ७.२० वाजता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या वडनेर जवळील हॉटेल जय गुरुदेव समोर घडली. याप्रकरणी आज २८ जानेवारी रोजी नांदुरा पोलिसांनी अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना केली आहे.
टाकळी खाती (ता.जळगाव जामोद) येथील रहिवासी असलेले अरुण मारोती वानखडे (वय ४० वर्षे) यांचे मोठे बंधू प्रकाश मारोती वानखडे मलकापूर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आपली दुचाकी क्रमांक एमएच-२८-डीएच-२०४६ वर स्वर होऊन घराकडे परत निघाले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या वडनेर जवळील हॉटेल जय गुरुदेव समोर समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या  दुचाकीने क्रमांक एमएच-१५-डीएन-६४८१ ने प्रकाश वानखडे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत प्रकाश वानखडे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर आरोपी चालकाने जखमीला मदत करण्याऐवजी आपली दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी अरुण वानखडे यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध खालील भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १०६ (१), ३२४ (४), मोटार वाहन कायद्याचे कलम १३४, १८४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रमोद चिखलकर हे करीत आहेत. आरोपी चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!