महाराष्ट्र माझा

दिल्ली पोलीस पुन्हा एकदा नंबर वन!

संरक्षण मंत्रालयाने उमटवली मोहोर

नवी दिल्ली: देशाच्या ७७ वा प्रजासत्ताकदिन दिल्लीच्या कर्तव्यपथावर धूमधडाक्यात साजरा झाला. या दिनानिमित्त पार पडलेल्या दिमाखदार संचालनाने देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. या संचलनाचे निकाल नुकतेच संरक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. त्यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दले आणि इतर पूरक दलांच्या श्रेणीत “दिल्ली पोलीस” संचलन तुकडीने पुन्हा एकदा बाजी मारली असून परीक्षकांच्या निवड श्रेणीमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी म्हणून गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या तुकडीत महाराष्ट्रातील रांगड्या जवानांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, हे विशेष!
दिल्लीच्या कर्तव्यपथावर संचलन करणाऱ्यांची यादी नुकतीच संरक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात असून त्यांनी संचलनातील विजेत्यांची निवड दोन मुख्य श्रेणींमध्ये केली आहे. त्यामध्ये जजेस चॉईस, दिल्ली पोलीस संचलन तुकडी आणि पॉप्युलर चॉईस, केंद्रीय राखीव पोलीस दल, चा समावेश असून यातील विजेत्या तुकड्यांना आणि चित्ररथांना चषक प्रदान करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने आज ३० जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रम पार पडला.
दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील आरआर कॅम्पमध्ये दुपारी १२ ३० वाजता पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दिल्ली पोलीस आयुक्त आणि सीआरपीएफच्या महासंचालकांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे केवळ लष्करी सामर्थ्याचे दर्शन नसून ते शिस्त आणि देशप्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यामध्ये मिळवलेले यश त्यांच्या कठोर मेहनतीचे फळ आहे. दिल्ली पोलिसांच्या या यशामुळे दलात उत्साहाचे वातावरण आहे. शिस्तबद्ध संचलन, ताळमेळ आणि अंगावर शहारे आणणाऱ्या सादरीकरणामुळे परीक्षकांनी त्यांना प्रथम क्रमांकाने गौरवले आहे. सोशल मीडियावरही दिल्ली पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून दिल्ली पोलीस पुन्हा एकदा नंबर वन, ठरल्याचा पोस्ट नागरिक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!