स्मार्ट बुलढाणा

दुर्दैवी: विद्युत शॉक लागून सेवानिवृत्त परिचालकाचा मृत्यू

घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना घडली घटना

आनंद इंगळे

सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): बांधकामावर पाणी मारत असतांना मुख्य लाइनाचा जबर शॉक लागल्याने लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा (शिवणी आरमाळ) चे सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचारक संतोष गंगाराम आरमाळ (वय ६२ वर्षे) रा. शिवणी आरमाळ ह.मु.देऊळगाव मही यांचा आज ३१ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता दरम्यान मृत्यू झाल्याची  दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे शिवनी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

देऊळगाव मही येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतोष आरमाळ यांच्या नविन जागेचे बांधकाम सुरू आहे. आज ३१ जानेवारीच्या सकाळी ८.३० वाजता दरम्यान ते नेहमी प्रमाणे घराच्या तिसऱ्या माळ्यावर बांधकाम पूर्ण झालेल्या जागेवर पाणी मारण्यासाठी गेले असता, घरासमोरून गेलेल्या मुख्य विद्युत तारेला नकळत त्यांचा स्पर्श झाला आणि जबर शॉक लागून ते घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्या गेले. यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापतही झाली.
शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी त्यांना तात्काळ जखमी अवस्थेत देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले. जालनास्थित कलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केले असता, उपस्थित डॉक्टरांनी आरमाळ यांना मृत घोषित केले. जिल्हा परिषद शाळा अंढेरा (सेवानगर ) येथील शिक्षक हरी आरमाळ यांचे ते वडील होते. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!