स्मार्ट बुलढाणा

सात पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवागौरव

पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला निरोप समारंभ

बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ७ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा निरोप समारंभ आज ३१ जानेवारी २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्यंत भावूक वातावरणात पार पडला.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खालील सात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा त्यांच्या गौरवशाली सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संजय गंगाराम ठाकरे, सीआरओ पोलीस उपनिरीक्मषआज महादेव श्रीपत धंदरे, बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश भगवान मोरे, जानेफळ पोलीस स्टेशनचे जीपीएसआय गणेश तुकाराम गाभणे, धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे अनिल रामदास निंबाळकर, मोटार परिवहन विभागाचे सहाय्यक फौजदार, गजानन सुखदेव निंबाळकर आणि तामगाव पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले अशोक सुभाष वावगे यांच्या समावेश आहे.
बुलढाणा दलाच्या पोलीस कल्याण शाखेच्या वतीने आयोजित या सोहळ्यात पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) बी.डी.पावरा आणि राखीव पोलीस निरीक्षक तिडके यांच्या हस्ते सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी सर्वांना शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, मोमेंटो, झाडाचे रोपटे, भेटवस्तू आणि साडी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय हुडेकर, ज्योती राठोड, बीना श्रीवास्तव यांच्यासह निवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे ५० नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!