क्राईम जगत

लज्जास्पद: सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग

मुलीसमान नव्या सुनेवरच फिरली नियत; नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): लग्नानंतर आयुष्यभरासाठी आधार देणाऱ्या सासरच्या घरातच एका १९ वर्षीय नवविवाहितेचा तिच्या सख्ख्या सासऱ्याने विनयभंग केल्याची खळबळजनक आणि लज्जास्पद घटना वडनेर भोलजी (ता.नांदुरा) येथे उघडकीस आली आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या आरोपी सासऱ्याविरुद्ध नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडनेर भोलजी येथील १९ वर्षीय पीडित तरुणीचा विवाह ९ एप्रिल २०२५ रोजी असलम शेख महेबुब याच्याशी झाला होता. संसाराची नवी स्वप्ने घेऊन पीडिता नांदायला सासरी  आली. लग्नानंतरचे सुरुवातीचे दोन-तीन दिवस सर्व काही सुरळीत सुरू चालले. मात्र, त्यानंतर सासऱ्याची नियत फिरली आणि घरच्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन आरोपी सासरा शेख महेबुब याने तिच्यावर वाईट नजर ठेवायला सुरुवात केली.
मे २०२५ मध्ये एक दिवस घरात कोणीच नसताना आरोपी सासऱ्याने पीडितेच्या खोलीत प्रवेश केला. तिची इच्छा नसताना जबरदस्तीने तिचा विनयभंग करून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. पीडितेने या कृत्याचा कडाडून विरोध आणि प्रतिकार केला. मात्र, आरोपीने याबाबत कोणाला काही सांगितले तर याद राख, “तुझी फारकत करून टाकीन”, अशी धमकी दिली. घाबरलेल्या पीडितीने भीतीपोटी मौन बाळगले. घडलेली घटना शारीरिक आणि मानसिक वेदनादायक असल्यामुळे पीडिता गेल्या काही महिन्यांपासून कमालीच्या दडपणाखाली होती. तसेच मे २०२५ पासून कालपर्यंत तिचा हा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच होता.
दरम्यान, पीडितेच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि तिने हिंमत एकवटून २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी नांदुरा पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना तिच्यासोबत घडलेली आपबिती कथन केली. नांदुरा पोलिसांनी आरोपी शेख महेबुब याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम कलम: ७५ (१) (i) (ii) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!