क्राईम जगत

गळा चिरला! दानापूरमध्ये रक्ताने माखला मांजा

प्रशासनाच्या नाकाखाली मांजाचा वापर सुरूच 

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शेगाव-दानापूर रोडवर पतंगाच्या धारदार मांजामुळे शेख अनिस शेख नफफार (वय ४० वर्षे) यांचा गळा चिरला गेल्याची रक्तरंजित घटना नेमकीस उघडकीस आली. प्रशासनाच्या नाकावर टिकून सर असलेल्या खुलेआम मांजाच्या वापरामुळे प्रशासन बंदीचे दावे पोकळ ठरले असून या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.
संग्रामपूर येथील रहिवासी असलेकर शेख अनिस हे १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांसोबत दुचाकीने कामावरून परतत होते. दानापूर येथील विद्युत वितरण कार्यालयाजवळील पुलावरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यासमोर मांजा आला. त्यांना काही कळण्याच्या आतच हा धारदार मांजा गळ्यात रुतला आणि अनिस यांचा गळा चिरला गेला आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. नागरिकांनी त्यांना वरवट बकाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. सदर ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना शेगाव आणि त्यानंतर अकोला येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. सध्या त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ आणि नवीन भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (ब) नुसार मांजा विक्री आणि वापरावर कडक बंदी आहे. मग दानापूर-तेल्हारा परिसरात हा मांजा आला कुठून?, असा सवाल उपस्थित होत असून हिवरखेड आणि तामगाव परिसरातील छुप्या मार्गाने होणारी मांजा तत्काळ बंद करण्याची मागणी होत आहे.
याप्रकरणी अनिस यांनी २ फेब्रुवारी रोजी तामगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी झिरो प्रमाणे गुन्हा दाखल केला असून घटनास्थळ अकोला जिल्ह्यात येणाऱ्या हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने तपास हिरवडखेड पोलिसांकडे वर्ग केला आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!