लोणारमध्ये बनावट कीटकनाशके पकडली
२९ हजारांचा मुद्देमाल जप्त; कृषी केंद्र धारकाविरुध्द गुन्हा दाखल

मूळ बॉटलच्या तुलनेत बनावट बॉटलवरील लोगोचा रंग फिक्कट हिरवा आढळून आला, तर मूळ बॉटलवर गडद हिरव्या रंगाचा लोगो आहे. तसेच इंग्रजीतील जीटीआयएन, जीटीआयएन नंबरमधील ‘२’ ऐवजी ‘०२’, सिरीयल नंबरमधील फॉन्टमधील फरक, तसेच बॉटलच्या झाकणाच्या रंगातही तफावत आढळून आली. या बनावट औषधांची विक्री करून आरोपीने संजेता कंपनीची प्रतिमा मलीन केली. शासनाच्या महसुलाचे नुकसान केले. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक व शेतीविषयक मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण केल्याची तक्रार सतीश तानाजी पिसाळ (वय ३४ वर्षे), रा. नाशिक यांनी लोणार पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सचिन सुभाषचंद्र बोरा (वय ४७ वर्षे), रा. लोणार याच्याविरुध्द दुकानदाराविरुद्ध प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ (सुधारित १९८४ व १९९४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे हे करीत आहेत. या कारवाईमुळे लोणार परिसरात बनावट कृषी औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी औषधे खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



