क्राईम जगत

निवृत्त ब्रिगेडियरची शेगावमध्ये फसवणूक

"योगीराज"च्या संचालकावर गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): नागपूर येथील जयताळा परिसरातील रहिवासी असलेले निवृत्त ब्रिगेडियर यांची शेगाव येथील “योगीराज भक्त निवास” मधील युनिट विक्री प्रकरणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांत अमरावती येथील आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतील सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले ब्रिगेडियर माधव विष्णू खानझोडे (वय ७६ वर्षे) हे नागपूर येथील जयताळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांनी २०१४ मध्ये संतनगरी शेगाव येथील बाळापूर रोडवर सर्वे नंबर २२६/१, १५, १६, १७, १८ मध्ये असलेल्या योगीराज भक्त निवासात एक युनिट खरेदी केले होते. त्यांची व्यवहार प्रक्रिया १० नोव्हेंबर २०१४ पासून ते २३ जून २०२५ दरम्यान सुरू होती.
यातील आरोपी प्रविण कृष्णराव चावजी (वय ५७ वर्षे) रा. योगीराज नगर, तपोवन, अमरावती याने सदर ले-आउटमधील प्लॉटचे कायदेशीररीत्या एकत्रीकरण न करता, तसेच योगीराज भक्त निवास, या इमारतीचे बांधकाम करताना आवश्यक असलेले “डेट ऑफ डिक्लेरेशन” आणि “कम्प्लिशन सर्टिफिकेट” न घेताच या युनिटची विक्री केली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता विक्री केल्याने आपली फसवणूक झाल्याचे खानझोडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्याकडे फसवणुक झाल्याची तक्रार दाखल केली. या अर्जाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तांबे यांनी आदेश क्रमांक (पो अबू/सीआर १५/ फसवणूक गुन्हा दाखल परवानगी /२०२६-३२२) अन्वये ३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शेगाव शहर पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारिंगे हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!