क्राईम जगत

पुन्हा एका २७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

आवार (ता.संग्रामपूर) येथील घटना

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी) : संग्रामपूर तालुक्यातील आवार येथील एका २७ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. ऐन तारुण्यात श्रुतीने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे आवार गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आवार (ता.संग्रामपूर) येथील श्रुती सुरेश बोदडे (वय २७ वर्षे) हिने ५ फेब्रुवारीच्या रात्री ९ ते ६ फेब्रुवारीच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात पाळण्याच्या दोरीने गळफास लावुन घेत आत्महत्या केली. सकाळी कुटुंबियांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

या प्रकरणी नरेश रामदास बोदडे (वय ३० वर्षे) यांनी तामगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!