क्राईम जगत

सावधान: मलकापूरमधून पुन्हा एक तरुणी बेपत्ता

रेल्वे स्टेशन परिसरातील घटना; मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी) : महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये जिल्ह्यात मलकापूर तालुका क्रमांक एकवर आहे. गेल्या दहा दिवसांत तालुक्यातून दहा ते पंधरा तरुणी बेपत्ता आल्याची नोंद असतानाच, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडोदा रेल्वे स्टेशन परिसरातून पुन्हा एक २० वर्षीय तरुणी संशयास्पद रित्या बेपत्ता झाली. ही खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली.

मुळचे मध्य प्रदेश राज्यातील सिधी गावचे रहिवासी असलेले कमलेश कोल (वय ४२ वर्षे) यांचा व्यवसाय मजुरी आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते मजुरीच्या कामासाठी वडोदा रेल्वे स्टेशन परिसरात राहत आहेत. दरम्यान, काहीतरी खाजगी काम असल्याने कमलेश कोल हे त्यांच्या मूळ गावी सिधी (मध्य प्रदेश) येथे गेले होते. तर त्यांची मुलगी आसमी ही तिच्या मावशीकडे राहत होती. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास, आसमी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही.

याप्रकरणी कमलेश कोल यांनी ११ फेब्रुवारी रोजी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. आसमी कोल हिचा रंग गोरा, उंची ५ फूट, चेहरा गोल, कपाळ उंच, मध्यम बांधा असून तिने अंगात गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे. उपरोक्त वर्णनाची तरुणी कुठे दिसून आल्यास किंवा तिच्या संदर्भात काही माहिती मिळाल्यास मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार उल्हास मुके हे करत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!