स्मार्ट बुलढाणा

मोताळ्याच्या भीषण अपघातात एक ठार

ट्रिपल सीट दुचाकीची स्कुटीला धडक

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकीने स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात इलेक्ट्रिक स्कुटी चालक अजय किसन खर्चे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बुलढाणा-मलकापूर रोडवर असलेल्या अर्बन बँकेसमोर ही घटना घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सांगळद येथील रहिवासी असलेले प्रमोद किसन खर्चे (वय ६४ वर्षे) यांचा भाऊ अजय हा ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या आकाया कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटी क्रमांक एमएच-२८-बीआर-८७४८ ने मोताळा येथील अर्बन बँकेसमोरून जात होता. त्याच वेळी समोरून येणाऱ्या होंडा ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक एमएच-२८-एवाय-३२०३ वरील चालक वैभव कैलास बावस्कर (वय २३ वर्षे) रा. कोथळी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून खर्चे यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत अजय खर्चे यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी चालक वैभव बावस्कर हा स्वतः देखील जखमी झाला आहे. धडक इतकी भीषण होती की इलेक्ट्रिक स्कुटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, आरोपीने दुचाकीवर स्वतःसह इतर दोघांना बसवून रहदारीच्या नियमांचे उल्लंघन केले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेमुळे सांगळद परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी प्रमोद खर्चे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी वैभव बावस्कर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १०६ (१), २८१, ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १२८/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपीश कशपाग हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!