क्राईम जगत

मलकापूरच्या सिराढोणमधून २० वर्षीय तरुणी बेपत्ता

थांबता थांबेना बेपत्ता होणाऱ्यांचे सत्र

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून मलकापूर शहर तसेच परिसरात तरुणी बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच आहे. असे असताना, सिराढोण (ता.मलकापूर) येथून पुन्हा एक २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण हरवल्याची नोंद घेण्यात आली आहे. मुलीने पत्ता होण्याचे वाढते प्रमाण पाहता यावर सामूहिकरीत्या कठोर उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मलकापूर तालुक्यातील सिराढोण येथील रहिवासी असलेले तुकाराम चहादु राणे (वय ४८ वर्षे) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १२ फेब्रुवारी रोजी तुकाराम राणे नेहमीप्रमाणे शेतातून घरी आले. आणि परत संध्याकाळी अंदाजे साडेसहा वाजेच्या सुमारास ते गुरांचा चारा-पाणी करण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांची मुलगी वैष्णवी तुकाराम राणे (वय २० वर्षे) ही घरी एकटीच होती. तुकाराम राणे काम आटोपून घरी परतले तेव्हा त्यांना आपली मुलगी वैष्णवी घरात दिसून आली नाही. सुरुवातीला ती आसपास कोणाकडे गेली असावी, असा अंदाज त्यांनी बांधला. मात्र, बराच वेळ लोटूनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा गावात आणि शेजारी-पाजारी शोध घेतला. फोनद्वारे नातेवाईकांनाही विचारपूस केली. मात्र वैष्णवीचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे तुकाराम राणे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली.

तक्रारीवरून मिसिंग दाखल केली आहे. बेपत्ता वैष्णवीचे वय वीस वर्षे असून रंग गोरा आहे. तसेच तिने अंगात हिरव्या रंगाचा टॉप परिधान केलेला आहे. उपरोक्त वर्णनाच्या तरुणी बाबत काही माहिती मिळाल्यास मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी बाळू टाकरखेडे यांनी केले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!