स्मार्ट बुलढाणा

काळाचा घाला! भीषण अपघातात तरुण पत्रकाराचा मृत्यू

चिखली-खामगाव महामार्गावरील घटना

चिखली,( प्रतिनिधी) : चिखली-खामगाव-जालना महामार्गावर छोटा मेरा आणि असोला दरम्यान कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात चिखलीतील पत्रकार राजेंद्र (राजू) सुरडकर (वय ३७ वर्षे) रा. बेराळा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे चिखली शहरासह पत्रकारिता वर्तुळात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील बेराळा येथील रहिवासी असलेले राजू सुरडकर आपल्या तीन सहकाऱ्यांसह स्विफ्ट डिझायर कारने प्रवास करत होते. छोटा मेरा व असोला दरम्यान कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यांची कार थेट रस्त्यालगतच्या एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. तसेच या धडकेत राजेंद्र सुरडकर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कारमधील उर्वरित तिघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ पंचनामा करत पोलीस दप्तरी घटनेची नोंद असून पुढील तपास सुरू आहे.
मृतक राजू सुरडकर हे चिखली परिसरातील एक अभ्यासू आणि मनमिळावू पत्रकार होते. त्यांच्या अकाली निधनाने बेराळा गावावर आणि चिखलीतील पत्रकारितेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!